वसगडे येथे रिपब्लिकन पक्षाच्या शाखेचे उदघाटन मोठया उत्साहात संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) :-  गावं तेथे शाखा हा उपक्रम राबवून रिपब्लिकन पक्षाला उभारी देण्यासाठी जिल्ह्यातील तरुण युवकांनी कामाला लागले पाहिजे असे वसगडे ता. हातकणंगले येथील शाखेच्या उद्घाटन प्रसंगी जेष्ठ नेते दीपक भोसले हे बोलत होते. यावेळी सतिश माळगे(दादा) यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अनेक कोरोना वॉरिअर्स ना कोविड योद्धा सन्मान पत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत असताना माळगे दादा म्हणाले केंद्रीय मंत्री नाम. आठवले  यांच्या आदेशाने गावं, खेड्या, वाड्या-वस्तीमध्ये निश्चितच रिपब्लिकन पक्षाच्या शाखेचे येत्या काळामध्ये उदघाटने करू. यावेळी राधानगरी तालुक्याचे अध्यक्ष आयु. कुंडलिक कांबळे, पँथर अप्पा मोरे, रोजगार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप ढाले, इचलकरंजी शहराचे युवा नेते अमित शिंदे, कोल्हापूर शहराचे रोजगार आघाडी चे सचिन पाटील, संबोधी कांबळे, सतिश यादव, प्रवीण निगवेकर, साताप्पा चाफोडीकर, भरत कांबळे, युवा नेते गजेंद्र कांबळे, शाखा अध्यक्ष विलास कांबळे, उपाध्यक्ष अभिजित धनवडे, सुकुमार कांबळे, प्रशांत कांबळे, विजयराज कांबळे, शीतल कांबळे, पवन कांबळे, योगेश कांबळे, गणेश कांबळे, पंकज कांबळे, तुषार कांबळे, सुभाष धनवडे, किरण पंढरी, विशाल कांबळे, रोहिदास कांबळे, अतुल कांबळे यांच्या सह. परिसरातील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a comment

0 Comments