' दै. पुढारी ' चे मुख्य प्रतिनिधी सतीश सरीकर व पत्नी प्रिया सरिकर यांना 'आम्ही कोल्हापुरी फाउंडेशनचा ' "राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार " देउन गौरविण्यात आले.

 

कोल्हापूर  :  कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रिय असणाऱ्या दैनिक पुढारी च्या माध्यमातून पत्रकार व मुख्य प्रतिनिधी म्हणून सतीश सरीकर यांचे कार्य कौतुकास्पद आहे .समाजातील सर्व स्तरातील घटकांना व समस्यांना बातमी च्या माध्यमातून नेहमीच  न्याय देण्याचे काम ते करत असतात असे प्रतिपादन सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी शरद काटकर यांनी केले .आम्ही कोल्हापुरी फाउंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार सतीश सरीकर व त्यांच्या पत्नी प्रिया सरीकर  यांना प्रदान करण्यात आला . यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आम्ही कोल्हापुरी फाउंडेशनचे अध्यक्ष भारत धोंगडे होते. 

         कोल्हापूर जिल्हा परिषदेचे निवृत्त अधिकारी राजेंद्र सावंत यांनी आम्ही कोल्हापुरी फाऊंडेशनच्यावतीने सुरू असलेल्या सामाजिकसह इतर कार्याचा आढावा घेऊन  फाऊंडेशनचे समाजाभिमुख कार्य सुरू  असल्याबद्दल गौरवोद्गार काढले. 

  अध्यक्षस्थाना वरून बोलताना आम्ही कोल्हापुरी फाउंडेशनचे अध्यक्ष भारत धाेंगडे यांनी सतीश व प्रिया सरीकर यांच्या  पत्रकारितेमधील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केल्याचे सांगितले.सत्काराला उत्तर देताना सतिश सरीकर व  प्रिया सरीकर यांनी आम्ही कोल्हापुरी फाउंडेशन प्रती कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी आम्ही कोल्हापुरी फाऊंडेशनचे सचिव अरुण घाटगे , अँड. अशोक घुले , डॉ. अनिल भोसले, अंजना जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments