नाट्यचळवळ वाढीसाठी शासन सहकार्य करणार....सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर




जयसिंगपूर-

नाटका मुळे नव कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होत असते, मराठी रंगभूमीने महाराष्ट्राला अनेक गुणवंत कलाकार उपलब्ध करून दिले, नाटकांमुळे नवोदित कलाकारांची निर्मिती होत असते, त्याचबरोबर नाटक उत्तम समाजप्रबोधनाचे काम करीत असते, वसंत कानेटकर यांच्या नाटकांनी महाराष्ट्राला भरभरून असे साहित्य दिले आहे, त्यांनी लिहिलेली आणि त्यांची सादर झालेली ऐतिहासिक नाटके दर्जेदार असल्यामुळे यापुढेही ती अनेक वर्षे नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतील,

नाट्य चळवळीला बळ देण्यासाठी महाराष्ट्र शासन सहकार्य करेल असे सांगताना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मी प्राध्यापक वसंत कानेटकर यांना त्यांच्या जन्मशताब्दी महोत्सव शुभारंभ प्रसंगी आदरांजली वाहतो असे उदगार महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले,

ज्येष्ठ नाटककार प्राध्यापक वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवला शनिवार पासून सुरुवात झाली, नाट्यशुभांगी जयसिंगपूर व जयसिंगपूर नगरपरिषदेच्या सांस्कृतिक समितीच्या वतीने जयसिंगपूर येथील सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते,

जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने प्रमुख उपस्थित होत्या, नाट्यशुभांगी जयसिंगपूर चे अध्यक्ष ज्येष्ठ नाट्यकलाकार सुभाष ऊर्फ बाळ टाकळीकर यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले, यानंतर कानेटकर यांच्या प्रतिमेचे पूजन राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले, या समारंभास उपस्थित राहिल्याबद्दल संयोजकांच्या वतीने नामदार यड्रावकर व नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने यांचा सत्कार करण्यात आला,

संजय हळदीकर, अखिल भारतीय नाट्यपरिषद समन्वय समितीचे सदस्य मुकुंद पटवर्धन, नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने यांनी मनोगते व्यक्त केली, आभार शिरीष यादव तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ओंकार कुलकर्णी यांनी केले, समारंभानंतर रायगडाला जेंव्हा जाग येते या नाटकातील छोटासा प्रवेश अमोध कुलकर्णी यांनी इथे ओशाळला मृत्यू या नाटकातील प्रवेश निखिल आणेगीरीकर यांनी सादर केला,

कोरोना च्या पार्श्वभूमीवर नाट्यशुभांगी चे सर्व सन्माननीय सदस्य व मोजके नाट्यरसिक या समारंभास उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post