मा. नुतन‌ संरपंच सौ. प्रियंका चंद्रकांत आजगेकर यांना राष्ट्रीय आदर्श समाजसेविका गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 इचलकरंजी :  इचलकरंजी येथे समाजवादी प्रबोधनी हॉलमध्ये पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन मा. पी.एम.पाटील व स्वाभिमानी संघटनेचे नेते जयकुमार कोले, ई.न.प.चे कामगार अधिकारी राजापुरे, इ.न.प.चे ईस्टेट अधिकारी सी.डी.पवार व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मुख्याध्यापक चंद्रकांत आजगेकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांना शाल, श्रीफळ, फेटा, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह  देऊन सन्मानपुर्वक गौरव  करण्यात आले. 

  कार्यक्रमाचे. प्रमुख संयोजक म्हणून अध्यक्ष विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम करन्यात आला. 

   सौ.प्रियंका आजगेकर यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. ते समाजामध्ये प्रामाणिक व निष्ठावंतपने उल्लेखनीय कार्य करत असतात.  याचीच दखल घेऊन त्यांना आदर्श समाजभुषण, आदर्श समाजरत्न, आदर्श महिला असे  गौरव पुरस्कार  मिळाले आहेत. तसेच त्यांचे पती मा. चंद्रकांत आजगेकर (मुख्याध्यापक)यांना सुध्दा राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक गौरव पुरस्कार देऊन शाल, श्रीफळ, फेटा, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानपुर्वक गौरव करण्यात आले. 

   पद्मजा फिल्म अँन्ड टेलीव्हीजन वेलफेलर अशोशिएशन सांगोला, यांच्या वतीने हा कार्यक्रम दि 28/2/2021 ला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ट्रस्टचे अध्यक्षा पद्मजा खटावकर अभिनेत्री, बी.जी.देशमुख, धोंडिबा कुंभार,नेतजी गोरे, बबन आवळे, प्रसाद कांबळे, अरुण कांबळे, अभिमन्यु कुरणे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments