ग्रामसेवक सुनेच्या आशिर्वादाने हुपरीत हावळ बंधूंचे अतिक्रमण ,. हुपरी ग्रामपंचायतीच्या आदेशाल हरताळ फासला.हुपरी (वार्ताहर)

हुपरी येथे मिलिंद हौसिंग सोसायटी परिसरात विजय शंकर हावळ, शशिकांत शंकर हावळ हे बंधू आपल्या ग्रामसेवक असणाऱ्या सुनेच्या आशिर्वादाने तसेच प्रविण विजय हावळ व प्रकाश विजय हावळ या मुलांच्या साथीने मिलिंद हौसिंग सोसायटीने रस्त्यासाठी सोडलेल्या जागेत अनधिकृत बांधकाम करुन  अतिक्रमण करीत आहेत अशी तक्रार संजय नामदेव शेंडे व भागातील नागरीकांनी हुपरी नगरपरिषदेकडे केली आहे.

सदर अतिक्रमणाबाबत यापूर्वी सदर बांधकाम अनधिकृत तसेच बेकायदेशीर असून ते काढून टाकावे असा हुपरी ग्रामपंचायतीला आदेश दिला होता. परंतू या आदेशाला हरताळ फासून सदर अतिक्रमण तसेच ठेवले आहे.त्यामुळे भागातील नागरीक संतप्त झाले आहेत.

Post a comment

0 Comments