हुपरी नगरपरिषदेकडून उघड्यावर कचरा टाकणे सुरु

 
हुपरी (वार्ताहर)

स्वच्छ सर्वेक्षणच्या नावाखाली गावभर भिंती रंगवून पोकळ वातावरण निर्माण करणाऱ्या हुपरी नगरपरिषदेचा खरा चेहरा समोर आला असून नागरीकांमध्ये  संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

हुपरी नगरपरिषदेच्या वतीने दररोज गोळा होणारा घनकचरा चक्क सिल्व्हर झोन या भागात उघड्यावर टाकला जात असून त्यामुळे सिल्व्हर झोनमध्ये गलिच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. या भागात कचऱ्याचे ढिगच ढिग दिसून येत असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.मोकाट कुत्री आणि डुकरांचा हैदोस यामुळे वातावरण अतिशय गलिच्छ झाले आहे. यामुळे नागरीकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

Post a comment

0 Comments