हुपरी नगरपरिषद विरोधात वीरकुमार शेंडूरे यांचे आजपासून आमरण उपोषण. सत्ताधारी भाजपाला घरचाच आहेरहुपरी (वार्ताहर)

गेल्या अनेक दिवसांपासून बिरदेवनगर येथील नागरीकांची नळ कनेक्शनची मागणी हुपरी नगरपरिषदेकडून पूर्ण होत नसलेच्या निषेधार्थ बिरदेवनगर येथील नागरीक आजपासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

बिरदेवनगर येथील नागरीकांना त्वरीत नळ कनेक्शन देणेत यावे अन्यथा दि. १२ मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा युवा नेते वीरकुमार शेंडूरे यांनी दिला आहे. त्यामुळे हुपरी नगरपरिषदेच्या सत्ताधारी भाजपा आघाडीला वीरकुमार शेंडूरे यांच्या रुपाने घरचाच आहेर मिळाला आहे.

बिरदेवनगर भागातील ४०० नागरीकांचे पाण्याविना आतोनात हाल होत आहेत. यापूर्वी सतत मागणी केल्यामुळे पाणीपुरवठा करणेसाठी हुपरी नगरपरिषदेने जलवाहिन्या टाकलेल्या आहेत. मात्र अद्याप पाणीपुरवठा सुरु केलेला नाही. म्हणून याप्रश्नी युवा नेते वीरकुमार शेंडूरे, भागतील नागरीक, माता भगिनी बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

वरीलप्रमाणे आंदोलनाचे निवेदन हुपरी नगरपरिषद व पोलिस ठाणे यांना देणेत आले आहे.या आंदोलनात राजेंद्र मगदूम, सुनिल मगदूम,मनोज भोसले, सदाशिव सुतार,महादेव डोंगळे, शहाजी शिंदे हे सहभागी होणार आहेत.

Post a comment

0 Comments