यड्राव मधील पाच प्रोसेसचा वीजपुरवठा खंडित , प्रोसेस धारकामध्ये उडाली खळबळ.



(हातकणंगले प्रतिनिधी -  आप्पासाहेब भोसले ) 

हातकणंगले : क्लोजर ची नोटीस देऊन हि​ उद्योग सुरू ठेवल्याने महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार महावितरणने पार्वती औद्योगिक वसाहत मधील पाच​ ​ प्रोसेसचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामध्ये मनपसंद, जुबली, बाहुबली, बिर्ला,व​ ​ आयको टॅक्स या पाच​ प्रोसेसचा समावेश आहे. त्यामुळे​ प्रोसेस धारका मध्ये खळबळ उडाली आहे.

​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ पंचगंगा नदी प्रदूषणात कारणीभूत ठरला प्रकरणे जबाबदार उद्योजकांवर गेल्या महिनाभरापूर्वी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला होता यातील काही प्रोसेस धारकांना​ कारणे दाखवा नोटीस तर काही​ प्रोसेस धारकांना​ क्लोजर ची नोटीस बजावली होती.​ यड्राव मधील मनपसंद,​ बाहुबली, जुबिली, बिर्ला व आयको टॅक्स या प्रोसेस ना क्लोजर नोटीस देण्यात आली होती. अखेर महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पत्रानुसार उपकार्यकारी​ अभियंता सुनील अकी वाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता अभिजीत बिरनाळे यांच्या पथकाने पाचही प्रोसेसचा वीज पुरवठा खंडित केला त्यामुळे या​ पाच् प्रोसेस वर अवलंबून असणारा 600 कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे .


--

Post a comment

0 Comments