नागरिकांच्या सोयीसाठी नविन मतदान केंद्रे सुरु करा इचलकरंजी प्रांताधिकारी यांना निवेदन.
हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले.       

हातकणंगले :  तारदाळ मधील वाढीव भागातील जी के नगर, कृष्णा नगर ,आझाद नगर ,रामनगर ,हनुमान नगर ,महात्मा गांधी नगर ,तुळजाभवानी नगर, लक्ष्मी नगर येथील नागरिकांना मतदान करण्यासाठी चार ते पाच किलोमीटर प्रवास करावा लागतो

व नाहक त्रास सहन करावा लागतो  जी के नगर परिसरात असणाऱ्या जिल्हापरिषदेच्या शाळेत  नवीन मतदान केंद्र करून ही समस्या सोडविण्यात यावे त्याच बरोबर वाढीव भागात अनेक मतदान हे तारदाळ येथे नोंदणी करावी कारण ग्रामपंचयायत येणारा शासकीय निधी हा लोकसंख्येवर येत असल्याने  मतदान तारदाळ मध्ये करून घ्यावे याचे निवेदन मा.प्रांताधिकारी कार्यालयास  देण्यात आले यावेळीश्री स्वप्नीलजी आवाडे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले

याप्रसंगी तारदाळचे लोकनियुक्त सरपंच श्री यशवंत वाणी (भाऊ),जनता बँकेचे व्हाईस चेअरमन श्री सी.ए.चौगुले साहेब, माजी उपसरपंच श्री गणपती खोत, श्री कुमार कुंभार,रणजीत माने, अमित खोत,सचिन गावडे,सचिन चौगुले उपस्थित होते

Post a comment

0 Comments