जयसिंगपूरचे उद्योजक शंकर कुंभार यांना डाॕक्टर आॕफ फिलासाॕफी पदवि बहाल.
हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले                     

 येथील उद्योजक शंकर मारुती कुंभार यांना   कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी किंगडम ऑफ टोंगा यांचेकडून "डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी "पदवी देण्यात आली. गोवा येथे झालेल्या पदवीदान समारंभात  व्हाईस चान्सलर  डॉ.रिपूरंजन सिन्हा व इंडीयन ऑलिम्पिक असोसिएशनचे ट्रेजरर डॉ. आनंदेश्वर पांडे यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला .

       डॉ. कुंभार यांनी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून वेगवेगळे उद्योग निर्मिती मधून बेरोजगारांना रोजगार निर्मिती करून दिली. राज्यामध्ये दुष्काळ पडला तेव्हा चारा छावणी ,पूर परिस्थितीवेळी आपदग्रस्तांना मदत व विविध संस्थांच्या माध्यमातून सहकार्य करून उल्लेखनीय कार्य केले आहे तसेच महापूर परिस्थिती वेळी ज्या शाळांचे शैक्षणिक साहित्य नुकसान झाले अशा शाळांना  प्रयोगशाळा साहित्य, संगणक ,प्रिंटर, बेंच पुस्तक, कपाटे ,अशा प्रकारे मदत देऊन सहकार्य केले आहे .

        या त्यांच्या सामाजिक शैक्षणिक व व्यवसायिक कार्याचा विचार करून कॉमनवेल्थ  व्होकेशनल युनिव्हर्सिटी किंगडम ऑफ टोंगा यांचेकडून "मानद डॉक्टरेट" प्रमाणपत्र सन्मानपूर्वक देण्यात आले .

      हयात सेंट्रींक कंडोलीम- गोवा येथे झालेल्या समारंभात युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉ. रिपूरंजन सिन्हा व  इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे ट्रेजरर डॉ. आनंदेश्वर पांडे यांच्या हस्ते  डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. यावेळी समन्वयक सुनील देवार्डे हे प्रमुख उपस्थित होते.

          या समारंभास गट शिक्षणाधिकारी आर डी काळगे घन:शाम कुंभार ,सतीश पाटील,अनिल खिलारे ,शितल देमाणा ,मुकुंद कुंभार ,राजाराम सुतार ,देवाप्पा गावडे, बिरू वाळकुंजे, संपत कोळी ,बंडू राऊत  ,प्रणितकुमार, डॉ शंकर कुंभार यांच्या परिवारासह  विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments