पुर्व सुचना न देता लाईट कट करणा-या MSEB च्या कर्मचा-यांना राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाने रोखले.


हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले                      

यड्राव बेघर वसाहत येथे कोणतीही पुर्व सुचना न देता MSEB कडुन वीज कट केली जात होती. याला राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे कोल्हापुर जिल्हाध्यक्ष - गणेश आवळे ( वाहतुक महासंघ) आणि कोल्हापुर जिल्ह्याध्यक्ष - राजु टीळंगे (भटक्या विमुक्त जाती जमाती) यांनी कडाडुन विरोध केला . दोन दिवसांवर गावचा उरूस असल्याने विज कट करू नये अशी भुमिका घेतली . यावेळी MSEB च्या कर्मचा-यांनी आपल्या वरिष्ठांना याबाबत कल्पना दिली. व घटनास्थळी बोलाऊन घेतले . यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले यांना बातमी समजताच त्यांनी सुध्दा घटनास्थळी भेट दिली व अधिका-यांच्या बरोबर चर्चा केली. 


यड्राव बेघर वसाहतीमध्ये गोरगरीब व मोलमजुरी करणारे लोक रहायला आहेत . त्यांची हातावरचे पोट आहे. दररोज काम केल्याशिवाय चुल पेटत नाही तेव्हा MSEB ने सक्ती न करता यांना जमेल तसे लाईटबील भरण्यास मुभा द्यावी. तसेच गावचा ऊरूस असल्याने ज्यांची वीज तोडली आहे त्यांचे कनेक्शन पुर्ववत करावेत अशी मागणी केली . घटनेचे गांभीर्य आणि परिस्थीती लक्षात घेऊन MSEB च्या अधिका-यांनी सुध्दा नरमाईची आणि सहकार्याची भुमिका घेतली. आणि लवकरात लवकर लाईटबील भरावे अशी विनंती केली. आणि वीज कट केलेल्या ग्राहका़ची वीज कनेक्शन पुर्ववत केले..  यावेळी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a comment

0 Comments