इचलकरंजी शहरामध्ये बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना दाखले देण्यात यावेत. महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेची मागणी.

                                                                             


हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले    

 इचलकरंजी शहरामध्ये बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या बांधकाम कामगाराची संख्या मोठ्या प्रमाणात असून या कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाने कल्याण मंडळ स्थापन केले असून या मंडळाच्या माध्यमातून या कामगारांना विविध योजनेचे लाभ देत आहेत तरी सध्या हे सर्व काम आॅनलाईन पध्दतीने चालू केल्या मुळे या कामगारांना नवीन नोंदणी किवा नूतनीकरण करायच असेल तर महानगरपालिका नगरपालिका व ग्रामपंचायत यांचा दाखला घ्यावा लागत आहे तरी आपण शहरातील बांधकाम कामगारांना दाखले देऊन सहकार्य करावे  या साठी आज महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने इचलकरंजी नगरपालिकेतील उपमुख्याधिकारी श्री गुजर साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपमुख्याधिकरी यांनी मा मुख्याधिकारी यांच्या सोबत चर्चा करून या कामगारांना दाखले देण्यास सहकार्य करू असे आश्वासन दिले निवेदन देते वेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र निकम सचिव राहुल दवडते इचलकरंजी शहर अध्यक्ष मेहबूब गवंडी उपस्थित होते

Post a comment

0 Comments