अजाद शत्रू कै शिवलिंग पांगिरे हे बेडकिहाळ परिसरातील लोक सवगंडी,
समाज जीवनामध्ये काही माणसे आपल्या विचाराने कामाने स्वतंत्र ओळख निर्माण करतात, समाजमनाव रव  व्यक्ती मनावर आपल्या कर्तृत्वाची मुद्रा उमठवतात हे त्याच वेळेला शक्य होते ज्यावेळी प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करताना अस्तित्वासाठी टोकाचा जीव  संघर्ष करावा लागतो त्यांच्या सामान्य पणातून असामान्यत्व प्रकट होते असे एक बेडकिहाळ पंचक्रोशीतील काजळमाया असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे कै. शिवलिंग सिद्धाप्पा पांगिरे

      व्यक्ती मोठी होते ती पदवी मुळे नव्हे तर त्यांची वैचारिक बैठक व प्रत्यक्ष कार्य पांगिरे हे त्याचे उत्तम उदाहरण होय. लहान वयात पितृछत्र हरपले पांगीरहून बेडकिहाळ येथे हे  कुटुंब स्थिरावले आई-वडिलांच्या कडून संस्काराचे बाळकडू त्यामुळे अल्पशिक्षित असून सुद्धा असामान्य माणूस म्हणून समाजामध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली अनुभव हा त्यांचा खरा गुरु होतो प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करत त्यांनी यश मिळवले आहे ते आजच्या नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहे वयाच्या आठव्या वर्षापासून मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाचनाने ते झपाटलेले होते वाचाल तर वाचाल हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले काम हे त्यांचे दैवत होते त्याग, संयम, स्पष्टवक्तेपणा प्रकट करण्याची तयारी या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यामुळे बाला अबाल वृद्धांना आधारवड वाटत होते अन्यायाविरुद्ध नेहमी आवाज उठवत असत. त्यांनी बेडकिहाळ व पंचक्रोशीत वृत्तपत्र रुजविले व वाचक वर्ग तयार केला या परिसरातील ते पहिले वृत्तपत्र विक्रेते होते हा व्यवसाय 1952 ला त्यांनी सुरू केला त्यावेळी सकाळ, लोकसत्ता, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्स्प्रेस पुढारी तरुण भारत सत्यवादी, नवसंदेश,सत्यवादी, लाकमान्य  त्याचबरोबर संयुक्त कर्नाटक कर्मवीर ही कन्नड वृत्तपत्रे त्याचबरोबर रसरंग, अमृत, रीडर डायजेस्ट यासारखी पाक्षिके ग्राहकांना वेळेत पोचवत असत. त्यासाठी त्यांना अनेक प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करावी लागली वाहतुकीची अपुरी साधने नदीवर बांधारा नव्हता पावसाळ्यात तर अत्यंत हलाखीची परिस्थिती चिखलात चालत जाऊन पेपर पोहच करत होते काही गावात तीन-चार ग्राहक तर काही गावात दहाच ग्राहक असतं. पण व्यवसाय वरची प्रामाणिक निष्ठा सामाजिक जाणीव समाज उभारनीत कर्तव्यभावना यामुळे  बेडकिहाळ, शमेनवाडी नेज, गळतगा, भोग, जनवाड, बोरगांव असा त्यांचा क्रम असे याच वेळेला शालेय विद्यार्थ्यांना बेळगांव व चिक्कोडी कडून पुस्तके आणून पोच करत असत या व्यवसायात पडण्यापूर्वी घर प्रपंच चालवण्यासाठी पडेल ते काम मग ते पाटलांच्या म्हैशी राखणे असो किंवा शेताची पडेल ती कामे करीत असत त्यांच्या जीवनात त्यांची आई गंगुबाई व पत्नी धर्मपत्नी सौ लक्ष्मीबाई आल्यापासून जीवनाला व घराला एक वेगळी दिशा मिळाली त्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून कष्ट घेतले याच दरम्यान घरी खानावळ सुरू केले सरकारी नोकर प्रवासी परिसरातील शिक्षक यांची अडचणी दूर झाली व  सेवा ही झाली पांगिरे यांची सिध्देश्वर ही खानावळ यावेळी खूपच प्रसिद्ध होती. पांगिरे यांच्या घराण्याला स्वातंत्र्य आंदोलनाचा वारसा होता शंकर पांगरे हे त्यांचे भाऊ निपाणीला विनोबा भावे आले होते त्यावेळी आपल्या मित्रांसह हे चालत  गेले होते त्यांच्या भाषणाचा परिणाम इतका झाला होता की त्यांच्या चळवळीत सामील होण्यासाठी आजार्‍याच्या चर्‍हाटे वहिनी बरोबर बिहार उत्तर प्रदेश राजस्थान ला गेले व येतांना सर्व धार्मिक स्थळांचे दर्शन घेतले ते धार्मिक वृत्तीचे होते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे त्यांना सखोल माहिती होती वाचनामुळे व राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील नेते कार्यकर्ते त्यागी यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध होता त्यामुळे त्यांना राजकीय पोहच चांगली होती आचार्य अत्रे यांचे भाषण ऐकण्यासाठी मित्रांसमवेत ते कुन्नूर ला रात्रीच्या वेळी चालत गेले होते त्यांच्याकडे असणारी जिज्ञासा कृती संवाद साधण्याचे कौशल्य यामुळे त्यांनी जनसामान्यात आपली प्रतिमा तयार केली होती  

  रत्नाप्पाण्णा कुंभार, गावकामगार पाटील, गावचे इनामदार, कुलकर्णी, आमदार कै. सिदगेंडा पाटील कै. बेडगे व कार्यकर्त्यांचा त्यांचा निकटचा संबंध होता अधिकारी वाणीने या लोकांबरोबर सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी विकासासाठी साकडे घालत होते त्यांचे दुकान व घर परगावाहून येणार्‍या जाणार्‍यांच्या, शाळेच्या मुलींसाठी व महिला वृद्ध प्रवासासाठी एक प्रकारे विश्राम धाम असायचे मुलींनी शिकले पाहिजे, व्यसना पासून दूर राहीले पाहीजे, नीतिमूल्यांची जोपासना झाली पाहिजे शेतकर्‍याला न्याय मिळाला पाहिजे उत्पादनाला योग्य भाव मिळाला पाहिजे महिलांवरील अन्याय थांबला पाहिजे व भ्रष्टाचार संपला पाहिजे साहित्य संमेलने झाली पाहिजेत यासाठी ते आग्रही असत.

    यांच्या 93 वर्षाच्या संपर्ण जीवनात त्यांना डॉ.जोशी, डॉ. देसाई, प्रभाकर पोतदार, बंडोपंत जोशी व सदलगेचे चिंचणीकर, मल्लाप्पा चौगुले व मित्र परिवार यांचा सहवास लाभल्यामुळे त्यांचे जीवन प्रामाणीक व तत्वनिठ्ठ, आध्यीत्मीक वाढण्यास मदत झाली. त्यांच्या निधनाने परिसरातील एक जाणता दृष्टा काजळमाया असणारा लोक सवंघडी हरपला आहे त्यांचे अपुरे स्वप्न व काम पुढे नेणे हेच खर्‍या अर्थाने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल त्यांच्या कार्याचा वसा त्यांचे पुत्र अरुण, उदय, पांगिरे किरण पांगिरे त्यांचे नातवंडे, रवि अमोल कपिल निखिल कृतिका कौशिक पुढे चालीतील ही अपेक्षा 

                                                                       शब्दांकन अजित सगरे, व प्रा.डी.एन.दाबाडे

Post a comment

0 Comments