8 मार्च जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न
इचलकरंजी : बुधवार दिनांक 10 मार्च 2021 रोजी महाराष्ट्र कामगार कल्याण भवन, भाग्यश्री कॉलनी इचलरकंजी या ठिकाणी महिला दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा कोल्हापूर शाखा - हातकणंगले व मुख्य मानवाधिकार संस्था शाखा इचलकंजी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला रविवार दिनांक 7 मार्च 2019 रोजी *रांगोळी स्पर्धा व पाक कला स्पर्धा* घेण्यात आले याकरिता २४ महिलांनी सहभाग नोंदविला आणि या स्पर्धेचे परीक्षण तेजस्विनी चचडी व सौ राखी मूरतले यांनी केले यानंतर बुधवार दिनांक 10 मार्च 2021 रोजी सावित्रीबाईंच्या पुण्यतिथीनिमित्तने बक्षीस वितरण समारंभ व महिलांच्या प्रबोधनाचा असा संयुक्तिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत भागवत मॅडम यांनी केले. 


 दीपप्रज्वलन व सावित्रीबाई, स्वामी विवेकानंद, व बिंदुमाधव जोशी, यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या व प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यानंतर कोरोना काळात व  देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय  निवड लक्ष्मण पाटील सर यांनी केले. सर्व मान्यवर प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री अशोक ठोमके यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. संजीवनी हरिहर मॅडम यांनी केले ग्राहक पंचायत महाराष्ट्र व मानवाधिकार संस्था यांचे आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला व इथून पुढील कामाची दिशा व वाटचाल सविस्तरपणे सांगितली यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री बी.जे.पाटील सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले ग्राहक पंचायतीच्या कामाचा आढावा घेतला व येणाऱ्या सर्व समस्या कशा सोडवल्या जातात व ग्राहकांची लूट कशी होते व त्याकरता न्याय कसे मागावे व कशा पध्दतीने निवारण करावे याकरिता महिलांनी कसे पुढे यावे इत्यादी सर्व गोष्टीचे सविस्तर विवेचन व मार्गदर्शन केले. व ही संघटना ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी सदैव खुले राहील अशी ग्वाही दिली. यानंतर चे दुसरे प्रमुख वक्त्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र, जिल्हाच्या महीला संघटिका व  मुख्य मानवाधिकार महिला संघटीका सौ. प्रमोदीनी माने मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला महिला दिनाचे महत्त्व सांगितले त्यांच्यावर होणारे अत्याचार कसे रोखता येतील व स्त्रियांनी कसे सक्षम व्हावे व अन्यायाविरुद्ध कसे लढावे या सर्व गोष्टी उदाहरणासह गोष्टी रूपाने स्पष्ट केल्या खरा अर्थाने महिला दिन हा रोज साजरा केला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले महिला या दोन घराण्याचा उद्धार करणारी स्त्री असते तिला समाजामध्ये तिचा सन्मान व आदर केला पाहिजे असे मत व्यक्त केले. यानंतर मान्यवरांच्या व प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते रांगोळी व पाककला स्पर्धेत सहभागी घेतलेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग सर्टिफिकेट व प्रथम, द्वितीय, तृतीय, आलेल्या महिलांना शिल्ड व प्रमाणपत्र सत्कार करण्यात येईल.प्रथम पाककला (गोड पदार्थ) प्रथम क्रमांक गायत्री पोटे व द्वितीय क्रमांक अलका बोरा व तृतीय क्रमांक प्रीती कबाडे यांचे तर पाककला (तिखट पदार्थ) मध्ये प्रथम क्रमांक भाग्यश्री पोटे द्वितीय क्रमांक गीता-भागवत व तृतीय क्रमांक सुजाता इंगवले यांचे नंबर आले व रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रुती लाटकर, द्वितीय क्रमांक भाग्यश्री कडतारे, तृतीय क्रमांक संगीता होगाडे, यांचे नंबर आले या सर्व स्पर्धकांचे  बक्षीस वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले. यानंतर मुख्य मानवाधिकार संघटनेच्या  इचलरकंजी शहराच्या निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले प्रथम या संघटनेचे शहर अध्यक्ष श्री अशोक ठोमके यांच्या निवडीचे पत्र अनिरुद्ध सावंत यांच्या हस्ते देण्यात आले. यानंतर शहर उपाध्यक्ष श्री शिवकुमार मूरतले सर जिल्हा सचिव अजित गोंधळी यांच्या हस्ते देण्यात आले. व इचलरकंजी शहर सचिव श्री लक्ष्मण पाटील सर  यांचे अभिजीत पडळकर यांच्या हस्ते देण्यात आले.तसेच इचरकंजी शहर महिला अध्यक्ष सौ संजीवनी हरिअर मॅडम यांना निवडीचे पत्र विशाल चौगुले सर यांच्या हस्ते देण्यात आले. इचलकरंजी शहर महिला उपाध्यक्षा वंदना भंडारे मॅडम यांच्या निवडीचे पत्र श्री अजित गोंधळी जिल्हा सचिव यांच्या शुभ हस्ते देण्यात आले. तर इचरकंजी शहर महिला सचिव सौ सरिता पांडव मॅडम यांच्या निवडीचे पत्र सौ प्रमोदिनी माने मॅडम यांच्या हस्ते देण्यात आले. या सर्वांच्या निवडी बद्दल सर्व मान्यवरांनी शुभेच्छा व कौतुक केले. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष कामगार भवन चे अधिकारी श्री सचिन खराडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व महिला स्पर्धकांचे कौतुक केले खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंच्या विचाराचे आज समाजात गरज आहे. इतरत्र भेडसावणाऱ्या समस्या स्त्रियांच्या वरील अत्याचार या सर्वांसाठी सक्षम उभे राहणे गरजेचे आहे असे आवाहन करून आपले मनोगत व्यक्त केले व इथून पुढच्या काळात विविध स्पर्धेसाठी व महिलांच्या उपक्रमासाठी कामगार भवन सदैव उपलब्ध करून दिले जाईल अशी ग्वाही दिली. यानंतर कार्यक्रमाचा शेवट म्हणजे आभाराचे गोड काम सौ राखी मुरतले मॅडम यांनी केले. स्टेज वरील सर्व मान्यवरांचे आभार मानले सर्व स्पर्धक महिलांचे आभार मानले परीक्षकांचे आभार मानले व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बी.जे. पाटील सर व प्रमुख वक्त्या सौ.प्रमोदिनी माने मॅडम व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सचिन खराडे सर  या सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाचे सर्व संयोजकांचे आभार मानून या दोन्ही संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले व या कामगार भवनातील सर्व कर्मचारी व खास करून ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानून या कार्यक्रमाचे सर्व सूत्रसंचालन करणाऱ्या सौ भागवत मॅडम यांचे आभार मानले व हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने संपन्न झाला असे जाहीर केले. या कार्यक्रमास उपस्थित सर्व श्री निमणकर सर, संजीवनी चिंगळे मॅडम, मुल्ला मॅडम सर्व स्पर्धक परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी ग्राहक पंचायतीचे हातकणंगले तालुका अध्यक्ष अशोक ठोमके साहेब, श्री मूरतले सर, व श्री लक्ष्मण पाटील सर मुख्य मानवाधिकार महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ. संजीवनी हरिअर मॅडम, उपाध्यक्षा वंदना भंडारे मॅडम, सचिव सरिता पांडव मॅडम, गीता भागवत मॅडम या सर्वांचे परिश्रम घेतले व हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Post a comment

0 Comments