इचलकरंजी शहरातील कोरोनायोध्दा पत्रकारांना आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्यावतीने वाढदिवसाचे औचित्य साधत कोविड 19 ची लस देण्यात आली.

इचलकरंजी : कोरोना काळात जीवाची पर्वा न करता विस्तृत माहिती जनतेसमोर मांडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या इचलकरंजी शहरातील कोरोनायोध्दा पत्रकारांना आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्यावतीने वाढदिवसाचे औचित्य साधत कोविड 19 ची लस देण्यात आली.*  ही लस अत्यंत सुरक्षित असून सर्वांनी ही लस घ्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी केले.

सन 2020 या वर्षात संपूर्ण देशभरात कोरोना महामारीचे संकट उद्भवले होते. या काळात इचलकरंजी शहरसुध्दा कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. या महामारीच्या काळात शहरातील पत्रकारांनी स्वत:ची पर्वा न करता कोरोना योध्दा म्हणून काम केले. कोरोना संदर्भात विस्तृत माहिती देण्यासह शहरवासियांना दिलासा देण्याचे काम केले. या कोरोना योध्दा पत्रकारांना कोविड 19 ची लस देण्याचे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी दोन दिवसापूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत येथील अलायन्स मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सोमवारी पत्रकारांना लस देण्यात आली.


यावेळी पत्रकार चिदानंद आलुरे, धर्मराज जाधव, पांडुरंग पिळणकर, संजय कुडाळकर, शरद सुखटणकर यांनी लस घेतली. याप्रसंगी प्रकाश मोरे, आदित्य आवाडे, बाळासाहेब कलागते, बाबासाहेब पाटील, महावीर कुरुंदवाडे, सर्जेराव पाटील, शेखर शहा, दीपक सुर्वे, शंकर येसाटे, नरसिंह पारीक, राहुल घाट, राजाराम बोंगार्डे, सुहास कांबळे, बिलाल पटवेगार, अमोल नांद्रे, पत्रकार हुसेन कलावंत, सुभाष भस्मे, अजय काकडे, अतुल आंबी, बाबासो राजमाने, फिरोज शेख आणि अलायन्स हॉस्पिटलचे शशांक राशिनकर आदी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments