छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते शासकीय अभिषेक करण्यात आला पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर पूजा करण्यात आली. शिवाई माता मंदिर येथे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते शासकीय अभिषेक करण्यात आला आहे. यावेळी आमदार अतुल बेनके यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थित होते.

दरम्यान, करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव साजरा करण्यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, शिवजयंती साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवजयंती कार्यक्रमास केवळ 100 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. प्रभातफेरी, बाइक रॅली काढण्यास मनाई करण्यात आली आहे.

Post a comment

0 Comments