विद्यार्थी वसतिगृहाची चळवळ स्वातंत्र्यसेनानी सरवदे यांनी पुढे नेली :नागनाथ कोतापल्ले



'पुणे :  वंचित,गरजू,गरिबांसाठी शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरु केलेली विद्यार्थी वसतिगृहाची चळवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी स्वातंत्र्यसेनानी प्रल्हाद सरवदे यांनी पुढे नेली. वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा मार्ग त्यामुळे प्रशस्त झाला',असे उद्गार माजी कुलगुरू नागनाथ कोतापल्ले यांनी काढले. 

स्वातंत्र्यसेनानी आणि माजी आमदार प्रल्हाद  सरवदे स्मृतिदिनानिमित्त 'पुण्यस्मरण' विशेषांकाचे  विशेषांकाचे नागनाथ कोतापल्ले यांच्याहस्ते पुण्यात झाले,त्यावेळी कोतापल्ले बोलत होते. अध्यक्षस्थानी एम डी शेवाळे,वसंत साळवे,एड कुणाल कांबळे,यशपाल सरवदे,दीपक म्हस्के,अशोक लगाडे,सुनील यादव उपस्थित होते.

हा कार्यक्रम रविवारी डॉ आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का चौक येथे हा कार्यक्रम झाला. डॉ कोतापल्ले म्हणाले,'निजामाच्या सरंजामशाहीत जन्माला  येवून मिलिंद कॉलेज,नागसेन वनाच्या उभारणीत डॉ आंबेडकर यांना मदत करणे,त्यासाठी झालेले कर्ज पुढे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना माफ करण्यास भाग पाडणे ,वसतीगृहांची चळवळ चालविणे यात प्रल्हाद सरवदे यांचे मोठे योगदान आहे. हा प्रेरणादायी इतिहास पुस्तिकेच्या रूपातून पुढे येत आहे,ही महत्वाची गोष्ट आहे. चळवळीची नव्याने मांडणी होणे त्यामुळे शक्य होईल . व्यवस्थेला प्रश्न विचारणारी पिढी तयार व्हावी म्हणून डॉ आंबेडकर,सरवदे यांनी वसतीगृहाची चळवळ चालविली. हीच शैक्षणिक चळवळ आणि लोकशाही भांडवलदारांच्या हातात गेली तर छोट्या जाती,जमाती आणि समूहांचे काय होणार याची काळजी आज वाटते'. 

यशपाल सरवदे यांनी प्रास्ताविक केले,दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले . सुनील यादव यांनी आभार मानले.     

Post a Comment

Previous Post Next Post