सध्या तरी लॉकडाऊनचा कुठलाही विचार नाही पण पुणेकरांनी कोरोना निर्बंधांचे पालन करणे आवश्यक ...महापौर मुरलीधर मोहोळ

 



पुणे :  पुण्यातील नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगबाबतच्या सर्वच नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या परत एकदा वाढू लागल्याने प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे पुन्हा एकदा कोरोना हॉटस्पॉट ठरू नये यासाठी आता महापालिका व जिल्हा प्रशासनाने जोरदार हालचाली देखील सुरु केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुणेकरांवर कडक निर्बंध लादण्यात येण्याची मात्र याचवेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सध्या तरी लॉकडाऊनचा कुठलाही विचार नाही पण पुणेकरांनी कोरोना निर्बंधांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

पुण्यातील वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येवरून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मोहोळ म्हणाले, पुणे शहरातील वारजे, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी, नगर रस्ता या चार भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. पण शहरातील महापालिकेची कोरोना हॉस्पिटल व आरोग्य यंत्रणा देखील सक्षमपणे कार्यान्वित आहे. मात्र प्रमुख हॉस्पिटल असलेल्या जहांगीर, दीनानाथ मंगेशकर,रुबी हॉल अशा काही रुग्णालयात बेड्सची कमतरता जाणवत आहे. पण कोरोना रुग्णांना बेड्स उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका प्रशासनाने रुग्णालय प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले आहे. रुग्णसंख्या वाढत असलेल्या भागात टेस्टिंग वाढवण्यावर भर येणार आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण पुढील काळात आपल्याला लॉकडाऊन, मायक्रो कंटेन्मेंट झोन यांसारख्या गोष्टींना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन होणे आवश्यक आहे. सक्रिय रुग्णांची संख्या आजमितीला 1300 वरुन 1700 वर पोहचली आहे.


.पुण्यातील वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येवरून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मोहोळ म्हणाले, पुणे शहरातील वारजे, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी, नगर रस्ता या चार भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. पण शहरातील महापालिकेची कोरोना हॉस्पिटल व आरोग्य यंत्रणा देखील सक्षमपणे कार्यान्वित आहे. मात्र प्रमुख हॉस्पिटल असलेल्या जहांगीर, दीनानाथ मंगेशकर,रुबी हॉल अशा काही रुग्णालयात बेड्सची कमतरता जाणवत आहे.

 कोरोना रुग्णांना बेड्स उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका प्रशासनाने रुग्णालय प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले आहे. रुग्णसंख्या वाढत असलेल्या भागात टेस्टिंग वाढवण्यावर भर येणार आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण पुढील काळात आपल्याला लॉकडाऊन, मायक्रो कंटेन्मेंट झोन यांसारख्या गोष्टींना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन होणे आवश्यक आहे. सक्रिय रुग्णांची संख्या आजमितीला 1300 वरुन 1700 वर पोहचली आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post