पुण्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी.



पुणे : राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले असून विविध शहरांमध्ये रोज कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात येत्या सोमवारपासून रात्री ११ ते दुसऱ्या दिवशी पहाटे सहा या काळात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २८ तारखेपर्यंत जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये बंद राहणार आहेत.

आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, यांच्या उपस्थितीत प्रशासन व लोकप्रतिनिधींची आढावा बैठक घेण्यात आली. विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,  पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार यावेळी उपस्थित होते. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती राव व विक्रम कुमार यांनी नंतर पत्रकारांना दिली. 

सौरभ राव म्हणाले, "पुणे जिल्हयात रूग्णांचे प्रमाण १० टक्के आहे. हे प्रमाण पाहून त्यामुळे काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. येत्या २८ तारखेपरयत काॅलेज-शाळा बंद, 

खासगी शिकवण्या बंद राहणार आहेत पूर्वपरीक्षांचे क्लासेस ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार असून याबाबत शुक्रवारी पुन्हा आढावा घेण्यात येईल.  हाॅटेल, बार रात्री ११ वाजता बंद होतील. रात्री ११ ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी (अत्यावश्यक सेवा वगळून)  लागू करण्यात आली आहे." 

''संचारबंदी, हाॅटेलबाबतची अंमलबजावणी सोमवारपासून होईल, तसे नवे आदेश काढले जातील. जीवनावश्यक वस्तू, विशेषत : भाजी पुरवठा, विक्रीवर बंधने नसतील, तो पुरवठा सुरळीत राहील. मात्र सोशल डिसटनस पाळणे गरजेचे आहे; तशा सूचना व्यापारी संघटनांना करणार,'' असल्याचेही त्यांनी सांगितले. 

लग्न, कार्यक्रम, सरकारी, राजकीय सभांसाठी २०० परवानगी असेल. मात्र पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय मंगल कार्यालयात विवाह सोहोळा आयोजित करता येणार नाही. त्यासाठी एक खिडकी योजना राहणार. कार्यक्रमांवर यत्रणा लक्ष ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.रूग्ण सापडलेल्या दाट लोकवस्त्यांमध्ये टेस्ट, ट्रेसिंग वाढवणारअसून लसीकरणाला प्राधान्य देण्यात येईल. जिल्हात मायक्रो कंटेंमेंट तयार करणार असून, ग्रामीण भागांत प्रत्येक तालुक्यात एक कोविड केअर सेंटर सुर करणार असेही त्यांनी सांगितले. 

Post a Comment

Previous Post Next Post