पुणे शहर परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले


पुणे : आज सकाळपासूनच वातावरण  नरम गरम दिसत होते हवेत उष्णता वाटत होती. आज दुपारी चार नंतर  पावसाने  आक्रमक पवित्रा घेत  झोडपून  काढले  काही वेळातच सर्वत्र पाणीच पाणी  दिसू लागले.

 दोन दिवसापूर्वीच पाउस पडणार अशी भविष्याणी हवामान खात्याने केली होती ती आज खरी ठरली.  मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील खड्डे दिसत नव्हते.वाहन धारकांना वाहन चालवताना  तारे वरची कसरत करावी लागत होती .

 दरम्यान आज दुपार नंतर कात्रज सुखसागर नगर, गोकुळ नगर, भारती विद्यापीठ सिंहगड रस्ता परिसरात वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट पावासाने हजेरी लावली आहे. दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली.

गेल्या आठवड्यापासून शहरातील किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. येत्या शुक्रवार (ता. १९) पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशाराही दिला आहे. दरम्यान पावसाने पुणे शहरात गुरवारीच  जोरदार हजेरी लावली. 




Post a Comment

Previous Post Next Post