अन्यथा वरिष्ठ अधिकारी यांच्या कार्यालयासमोर तिव्र आंदोलन छेडू

        हातकणंगले प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले :  नवे दानवाड (ता.शिरोळ)* येथील हरिजन हाउसिंग सोसायटीच्या 64 सभासद वारसदाराने सोसायटीच्या खुली जागेवर संस्कृतीक सभागृह त्वरित बांधून द्यावी,अन्यथा तक्रारदार विरुद्ध वरिष्ठ शासकीय अधिकार्‍यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू,अशा आशयाचे निवेदन गटविकास अधिकारी,तहसीलदार व कुरुंदवाड पोलीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आपल्या निवेदनात म्हणतात की प्लॉट क्रमांक 33 लगत असलेली खुली जागा ग्रामपंचायतीच्या ताब्यात असून त्या ठिकाणी 14 वा वित्त आयोगाचा निधीतून सभागृह बांधण्याचे काम मंजूर आहे,सदरची खुली जागा गौतम रामचंद्र कांबळे हे स्वतः बळकविण्याचे उद्देशाने वारंवार विविध प्रकारचे तक्रार मे.तहसीलदार,मे.गट विकास अधिकारी व पोलिस ठाणे या ठिकाणी करून बांधकाम बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे,त्यास अनुसरून गौतम कांबळे यांचा तक्रार अर्ज बाबत ग्रामपंचायतीने सुद्धा यापूर्वीच वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारीबाबत रीतसर खुलासा दिलेला आहे.हाउसिंग सोसायटीच्या सभासदांच्या हिताच्या दृष्टीकोनातून सामाजिक,धार्मिक व वैयक्तिक कार्यक्रमासाठी संस्कृतिक सभाग्रहाची सोय होणार असून आज अखेरची गैरसोय दूर होणार आहे.सदर हाऊसिंग सोसायटीमध्ये रस्ते,गटर्स,अंगणवाडी,विंधन विहीर,विज,पाणी व रमाई घरकुल, पंतप्रधान घरकुल सह अनेक शासकीय योजना राबवून ग्रामपंचायत ने पायाभूत विकास  कामे केलेले आहेत.आज सदर ठिकाणी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या मुला-मुलींना चांगले संस्कार केंद्र व्हावे म्हणून सांस्कृतिक सभागृहाची अत्यंत आवश्यकता आहे,यासाठी हाउसिंग सोसायटीच्या सर्व सभासदांच्या आग्रह मागणीनुसार ग्रामपंचायतीने 14 वा वित्त आयोगाच्या निधीतून कायदेशीर मार्गाने सभागृह बांधण्याचे काम मंजूर करून बांधकाम सुरू केले आहेत, या सर्व बाबींचा विचार करून सभागृहाच्या बांधकामास  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थगिती देऊ नये व ते लवकरात लवकर पूर्ण करून हाऊसिंग सोसायटीच्या रहिवाशांच्या वापरात द्यावी अशी नम्र विनंती निवेदनात केली आहे,या निवेदनातील सर्व बाबींचा विचार न करता जर फक्त एका खोडसाळ व कायदा  न जानणाऱ्या व्यक्तीच्या तक्रारीवरून संस्कृतीक सभागृहाचे बांधकाम थांबविण्याचे आदेश दिल्यास हाउसिंग सोसायटीच्या सभासद व त्यांच्या वारसदारांच्या कुटुंबावर फार मोठा अन्याय होणार आहे,या अन्यायाची दाद मागण्यासाठी नाईलाजास्तव तक्रारदार विरुद्ध व वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन,अमर उपोषण व निदर्शने या मार्गाचा अवलंब  करावे लागेल असा इशारा देण्यात आले  आहे या निवेदनाच्या प्रतीवर श्री कल्लाप्पा कांबळे विठ्ठल कांबळे राजू कांबळे सुखदेव कांबळे विजय श्रावसते महावीर कांबळे यांच्यासह बहुसंख्य सभासद व व त्यांच्या वारसदारांच्या सह्या आहेत

Post a comment

0 Comments