वरून कीर्तन आतून तमाशा

               


.


शिरोळ : (ओंकार पाखरे : शिरोळ तालुका प्रतिनिधी) : 

कुरुंदवाड नगरपरिषदेकडून कोरोना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणजे वरून कीर्तन आणि आणि आतून तमाशा अशी चर्चा कुरुंदवाड परिसरात रंगली आहे.         सविस्तर वृत्त असे की, कोरोना पुन्हा वाढतो आहे म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून मास्क न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यासाठी नेमलेले पथक मात्र वाहने अडवताना त्या वाहनांना... तसेच त्या चालकांना बाजूला घेताना त्या वाहन चालकांच्य अंगास हात लागतो. या पथकातील एकाच्याही हातास हॅन्डग्लोज नाहीत.  किंवा कोणाजवळ ही सॅनिटायझर नाही. केवळ आथिर्क वसुलीसाठी कोरोनाचे निमित्त नगरपरिषदेस मिळाले आहे.  कोरोना थांबविण्यासाठी वेशीवर प्रयत्न केले जात आहेत. पण आत शहरात मात्र कोरोना नियमावलीचा फज्जा उडाला आहे. स्वतः व्यापारी, दुकानदार मास्कचा वापर करीत नाहीत. हातास हॅन्डग्लोज नाही. कोणत्याही दुकानात सॅनिटायझर नाही. मूळ शहरातच नियमावलीचा फज्जा उडाला असताना शहराच्या वेशीवर वाहनचालकाना अडवून दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे कुरुंदवाड सह परिसरात नगरपरिषदेच्या या कारवाईची चर्चा वरून कीर्तन आतून तमाशा अशी होताना दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post