मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात शेतकरी आप्पासो बाबू आंबुपे जागीच ठारओंकार पाखरे :( शिरोळ तालुका प्रतिनिधी ) :

नवे दानवाड ता. शिरोळ येथील दावल मलिक दर्ग्याजवळील शेतात वृद्ध शेतकरी आप्पासो बाबू आंबुपे (वय 72) हे काम करत असताना त्यांच्यावर मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात जागीच ठार झाले. या घटनेने दत्तवाड, दानवाड परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र वनविभागाने यास अद्याप दुजोरा दिलेला नाही.

आंबुपे हे शेतात काम करत होते. जनावरांना चारा घेण्यासाठी त्यांचा मुलगा आला असता, तू चारा घेऊन जा, मी थोड्या वेळाने येतो, असे त्यांनी मुलाला सांगितले. त्यामुळे त्यांचा मुलगा चारा घेऊन गेला. पण खूप वेळ झाला तरी वडील घरी परत आले नाहीत, म्हणून तो पुन्हा त्यांना पाहण्यासाठी शेतातील द़ृश्य पाहून मुलाला धक्का बसला. आंबुपे यांचे कपडे विखरून पडले होते. तसेच अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या होत्या. मुलाने आरडाओरड केल्यावर ग्रामस्थ गोळा झाले. पण कुत्र्यांनी त्यांच्याही अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. माहिती समजताच घटनास्थळी कुरुंदवाड पोलिसांनी धाव घेतली. डॉक्टरांनी आंबुपे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे, मुलगी, असा परिवार आहे.

दरम्यान, वन विभागाने शेतातील ठशांची तपासणी केली. मात्र नेमका कुत्रा की अन्य प्राणी याचा खुलासा वन विभागाने केला नाही. याबाबत कुरुंदवाड पोलिसांत रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

Post a comment

0 Comments