अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विश्वास दादा बालिघाटे व शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सुरेश दादा सासणे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.




शिरढोण : साहेबलाल कलावंत : 

 विद्युत महावितरण कंपनी शिरढोण येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विश्वास दादा बालिघाटे व शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सुरेश दादा सासणे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

या उपोषणाच्या प्रसंगी कुरुंदवाड डेपोटी इंजिनीयर मुल्ला साहेब व शिरढोण विद्युत कंपनीचे  जूनियर इंजीनियर जाधव मॅडम यांना कोरोना च्या काळामधील वाढीव वीज बिल व कमीत कमी तीन ते चार महिन्यामधील वीज बिल माफ होई पर्यत महावितरण कडून वीज कनेक्शन तोडू नये.या मागणी साठी आग्रही भूमिका मांडण्यात आली. डेपोटी इंजिनियर मुल्ला साहेब यांनी या सर्व मागण्या मान्य केल्या असून घरगुती कनेक्शन कोणाचे ही कट करण्यात येणार नाही.असे आश्वासन दिल्या नंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

Post a comment

0 Comments