सांगली मनपात सत्तांतर होताच भाजप नेत्यांचे फोटो काढण्यात आले.

.


सांगली : सांगली - मिरज - कुपवाड महापालिकेत भाजपची सत्ता गेल्यानंतर महापालिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेख खाडे यांचे फोटो हटविण्यात आले.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर उपमहापौर दालनात भाजप नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, दिलीप सुर्यवंशी, सुभाष देशमुख, दिनकर पाटील यांचे फोटो परंतु महापालिकेत सत्तांतर होताच वरील सर्व फोटो हटविण्यात आले.

महापालिका निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये टोकाचे राजकारण रंगले होते. महापौर निवडीपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी सांगली महापालिकेत इतर कोणाचा प्रभाव नाही. त्यामुळे महापालिकेत भाजपचाच महापौर होणार असे वक्तव्य केले होते. त्यामुळे महापालिकेत प्रभाव नसणार्‍यांची महापालिकेत सत्ता आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार आमदारांचे फोटो उपमहापौर दालनातून हटविण्यात आले आहेत.

Post a comment

0 Comments