उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सांगली शहर, खाकी बिरादरी व ह्यूमन राइट जस्टिस असोसिएशनच्या वतीने आज रक्तदान शिबिर घेण्यात आले.
सांगली / प्रतिनिधी      

   उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सांगली शहर, खाकी बिरादरी व ह्यूमन राइट जस्टिस असोसिएशनच्या वतीने आज रक्तदान शिबिर घेण्यात आले. खाकी बिरादरी पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी कार्यरत आहे.  कोरोना काळात रक्त टंचाई होती. सामान्य रुग्णाना गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागते . शासनाने रक्तदानाचे आवाहन केले आहे. सामाजिक बंधिलकी लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी, ह्युमन राइट  जस्टिस असोसिएशन व खाकी बिरादरी तर्फे शिबिर आयोजित केले होते. 


याप्रसंगी पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच वेगवेगळ्या संस्था व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी रक्तदान केले.पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले याप्रसंगी पोलिस निरीक्षक अनिल तणपूरे , चंद्रकांत बेदरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार पाटील, जिल्हा उद्योगकेंद्र व्यवस्थापक नितीन कोळेकर, जिल्हा युवा अधिकारी  नेहरू केंद्र सांगली मनिषा कोचुरे,  खाकी बिरादरीचे अध्यक्ष प्रशांत पाटील ह्युमन राईट जास्टिस असोसिएशन चे प्रदेश अध्यक्ष हनिफडफेदार, राज्य सरचिटणीस विनोद नलावडे ,रमजान बागवान , आसिफ शिकलगार, जिल्हा अध्यक्ष अजय माने , कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मनिष कुलकर्णी , सांगली जिल्हा समन्वयक दादा खामकर , सचिव इरफान पखाली , जिल्हासरचिटणीस राजश्री सदामते, सौ . रेश्मा शेख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments