महंमदवाडीतील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलीपुणे : येथील महंमदवाडीतील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.याप्रकरणी वानवडी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पूजा चव्हाण (वय 22) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.महंमदवाडीतील ए वन पार्क या उच्चभ्रू सोसायटीत ती राहत होती. तिचे एकासोबत प्रेमसंबंध होते. त्यातूनच हा प्रकार घडल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे. पूजा रविवारी ए वन पार्क सोसायटीत घरात होती. त्यावेळी तिच्यासोबत दोन मित्रही होते.मध्यरात्रीच्या सुमारास तिने अचानक पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. त्यामुळे पूजा गंभीररित्या जखमी झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आई वडिलांना बोलावून त्यांच्याकडे चौकशी केली जाणार असल्याचे वानवडी पोलिसांनी सांगितले.

Post a comment

0 Comments