बॅंकांच्या कर्जाची वसुली लवकर पुणे - निबंधकांकडे कर्जवसुलीची अंतिम सुनावणी झाल्यानंतर कर्जवसुली प्रमाणत्र नागरी सहकारी बॅंका अथवा पतसंस्था यांना सात दिवसांत देण्याच्या सहकार आयुक्‍तांनी सूचना दिल्या आहेत. यामुळे बॅंकांच्या कर्जाची वसुली लवकर होण्यास मदत होणार आहे.

बॅंकांच्या किंवा पतसंस्थांना कलम 101 अन्वये देण्यात येणाऱ्या वसुली दाखला देण्याबाबतची कार्यवाही ही संबंधीत सहायक निबंधक यांच्याकडून करण्यात येते. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम व नियमातील तरतुदीनुसार याप्रकरणी 90 दिवसांत कार्यवाही पूर्ण करणे आवश्‍यक आहे.मात्र, याप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर वसुली दाखला मिळण्यास खुप विलंब होतो व त्यामुळे कर्जदारांकडून किंवा जामिनदारांकडून कर्ज वसुली वेळेत करता येत नाही, अशा तक्रारी सहकार आयुक्‍त कार्यालयात आल्या होत्या.यापार्श्‍वभूमीवर सहायक निबंधक अथवा उपनिबंधक यांनी वसुली दावाप्रकरणी अंतिम सुनवानी झाल्यानंतर सात दिवसांच्या आत वसुली दाखला देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच असा वसुली दाखला देण्यात अंतिम सुनावणी झाल्यानंतर सात दिवसापेक्षा अधिक कालावधी लागणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


                      मा .श्री. संजय कांबळे

 नगरसेवक इ.न.प.इचलकरंजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .

शुभेचंछुक - युवराज माळी नगरसेवक ,

 सदस्य- स्थायी समिती इ.न.प.इचलकरंजी व सुनील कलावंत

Post a comment

0 Comments