गजानन मारणेची थेट तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.



 पुणे - काही दिवसांपूर्वीच येरवडा कारागृहाबाहेर फटाके फोडून एका गुंडाचा वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार घडला होता. आता त्यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमोल बधे आणि पप्पू गावडे यांच्या खूनातून निर्दोष मुक्तता झालेल्या मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजानन मारणेची थेट तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

गजानन मारणेची सोमवारी सायंकाळी मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. मारणेचे स्वागत करण्यासाठी कारागृहाबाहेर त्याचे हजारो समर्थक उपस्थित होते. त्याची एक्सप्रेस हायवेवरुन जंगी मिरवणूक काढली. त्यात ५०० हून अधिक चारचाकी गाड्या सहभागी होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post