नगरसेवकांनी महासभेमध्ये दादागिरी दाखवत गुंडगिरीचा कळस केला पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्थायी समितीच्या सदस्य निवडीवरून भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांची ही पहिलीच सर्वसाधारण सभा होती. त्यामुळे आयुक्तांच्या स्वागतालाच शहरातील नगरसेवकांनी महासभेमध्ये दादागिरी दाखवत गुंडगिरीचा कळस केला.

पिंपरी चिंचवड शहराची ओळख ही सांस्कृतिक, शैक्षणिक शहराबरोबर एक उद्योगनगरी म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांमध्ये नगरसेवक आपल्या दादागिरीने त्याला गालबोट लावत आहेत. गुरुवारी या नगरसेवकांनी कळस गाठत सभागृहासारख्या लोकशाहीच्या पवित्र्य मंदिरातच एकमेकांवर धावून जात हाणामारीचा प्रयत्न केला. त्यामुळे नवीन आलेल्या आयुक्तांनी याकडे पाहून अक्षरशः तोंडात बोट घातले.

Post a comment

0 Comments