पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्‍तपदी राजेश पाटील, तर अतिरिक्‍त आयुक्‍तपदी विकास ढाकणेपिंपरी -
 पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्तपद गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त होते. आज नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांनी कार्यभार स्वीकारला. त्यांच्यासोबतच अतिरिक्त आयुक्त 1 या जागेवर विकास ढाकणे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनीही आयुक्त पाटील यांच्यासोबत सोमवारी कार्यभार स्वीकारला.

ओडिसा केडरचे 2005 च्या बॅचचे आयएएस राजेश पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍तपदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी आज (सोमवारी) मावळते आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडून पदभार स्वीकारला.तसेच महापालिका अतिरिक्‍त आयुक्तपदी विकास ढाकणे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनीही आजच पदभार स्वीकारला.

तत्कालीन अतिरिक्‍त आयुक्त संतोष पाटील यांची दोन महिन्यांपूर्वी पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त या पदावर बदली झाली. त्या पदावर त्यांची 17 डिसेंबर 2020 रोजी बदली झाली. तेव्हापासून अतिरिक्त आयुक्तपद रिक्त होते. त्यांच्याजागी भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील विकास ढाकणे यांची नियुक्ती झाली आहे.

ते उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची 12 फेब्रुवारी रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्‍त आयुक्‍तपदी बदली झाली आहे. त्यानुसार त्यांनी आज पदभार स्वीकारला.

Post a comment

0 Comments