पुणेकरांनी पुर्वीप्रमाणेच स्वयंस्फुर्तीने नियमांचे पालन करावे, असे आवाहन सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.



 पुणे : कोरोनामुळे लॉकडाउन कालावधीत पुणेकरांनी संयम बाळगून नियमांचे पालन केले होते. विशेषतः गणेशोत्सव, दिवाळीनंतर नववर्षांच्या स्वागतासाठी नागरिकांनी घरातच राहून पोलिसांना सहकार्य केले होते. त्यानुसार आता नव्याने शासनाच्या निर्णयानुसार पुणेकरांनी पुर्वीप्रमाणेच स्वयंस्फुर्तीने नियमांचे पालन करावे, असे आवाहन सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

शहरात दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्येत भर पडत चालली आहे. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्कचा वापर करणे, विनाकारण भटवंâती टाळणे, सोशल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायझरचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे. स्वयंस्फुर्तीने नियमांचे पालन केल्यास कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येला आळा घालण्यास मदत होणार आहे.नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून कुटूंबियांची काळजी घेणे गरजेचे आहे. शासनाच्या कोरोना नियमावलीनुसार नागरिकांनी पालन करावे, असेही आवाहन डॉ. शिसवे यांनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनासह स्थानिक पातळीकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका टाळता येउ शकतो.

गणेशोत्सवासह नववर्षांच्या स्वागताचे कौतुक

लॉकडाउन कालावधीत नागरिकांनी नियमांचे पालन केले आहे. गणेशोत्सव, दिवाळी आणि नववर्षांचे स्वागत करताना पुणेकरांनी राहतच राहून खबरदारी घेतली होती. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात होता. त्यामुळे आता नागरिकांनी पुन्हा पुर्वीप्रमाणेच खबरदारी घेतली पाहिजे. पोलिसांच्या आवाहनाला पुणेकरांनी योग्य प्रतिसाद दिला आहे. येणाऱ्या कालावधीतही नागरिकांनी सहकार्य केल्यास कोरोनाचा कहर थांबविण्यास मदत होणार असल्याचे डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post