नवी मुंबई / अशोक म्हात्रे
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करत शिवजयंती सोहळा दिमाखात साजरा केला.
कोकण अध्यक्ष तथा अभिनेत्री मा. अक्षता कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुकाध्यक्ष मा. रश्मी रावराणे व त्यांच्या टीमने सुंदर आयोजन वैभववाडी येथे, कुडाळ तालुका अध्यक्ष मा. दिपा ताटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कुडाळ मध्ये शिवरायांना मानवंदना दिली.विदर्भ विभाग महिला उत्कर्ष समिती अध्यक्ष मा. सुनिता इंगळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मूर्तिजापूर येथे, रायगड जिल्हाध्यक्ष मा. रेखा घरत व उरण तालुका अध्यक्ष मा. निर्मला पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उरण येथे हा कार्यक्रम महिलांना स्वसंरक्षण व आर्थिक सक्षमीकरण या विषयांवर मार्गदर्शन करत शिव वंदना करून संपन्न केला.
सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ज्योतिका हरियान यांच्यासह सुप्रिया पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच कणकवली तालुकाध्यक्ष शोभा पाष्टे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कणकवली येथे तर मा. विद्या बोंबले यांनी रत्नागिरी मध्ये आपल्या सहकाऱ्यांसह शिवरायांना मानवंदना देत हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवला.
0 Comments