लाॅकडाऊन करायचा का. ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवादा साधला



मुंबई –
 गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक शहरांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवादा साधला आहे.

‘राज्यात आतापर्यंत 9 लाख लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. कोविड योध्यांनी लवकरात लवकर लस टोचून घ्यावी. करोनाविरोधातल्या लढाईत मास्क हीच ढाल आहे, मास्क घाला लाॅकडाऊन टाळा’ असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

घरामध्ये बंद करून ठेवणं कुणालाही आवडणार नाही. पुढील महिन्यात करोना प्रसार होण्याला वर्ष पूर्ण होईल. या वर्षभराच्या काळात तुम्ही खूप चांगली साथ दिली. अजूनही करोनाचा धोका टळलेला नाही. यात दिलासादायक बाब म्हणजे आता करोना लस उपलब्ध झाली आहे. करोना योध्यांना विनंती आहे की त्यांनी लवकर लसीकरण करून घ्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात या आठवड्यापासून करोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. काल शनिवारी राज्यात 6218 नवीन रूग्णांचे निदान झाले आहे. तर 2567 रूग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. राज्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 95.16 टक्के आहे. आतापर्यंत 1992530 जण बरे होऊन घरी परतले आहेत.

लाॅकडाऊन करायचा का?

ज्यांना लाॅकडाऊन नको आहे त्यांनी, मास्क लावणे, हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे या नियमांचे पालन करावे, जर सर्वानी नियमांचे पालन केले नाही तर लाॅकडाऊन कडक पद्धतीने राबवावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

संबोधनातील महत्वाचे मुद्दे –

  • उद्यापासून धार्मिक कार्यक्रम बंद
  • सरकारी कार्यक्रम, सभांवर बंदी
  • गर्दी करणाऱ्या मोर्चांवर बंदी
  • सर्व यात्रा, उत्सवांवर बंदी
  • सरकारी, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना बंदी
  • राज्यातील सर्व कार्यक्रमांना बंदी
  • मास्क घाला लाॅकडाऊन टाळा
  • ऑफिसच्या वेळा बदला, गर्दी टाळा

Post a Comment

Previous Post Next Post