मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार.



मुंबई : 
राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांसह मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने याविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनासह राज्य सरकारने उपाययोजनांना सुरुवात केली आहे. दरम्यान,याच परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी वारंवार संवाद साधून मार्गदर्शन आणि धीर देण्याचे काम केले आहे. मु्ख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला सुरुवातीपासूनच जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात आणण्यामध्येही यश मिळाले होते. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासून राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.

त्यादरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधून परिस्थितीतीबाबत माहिती देणार आहे. उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ७ वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

यावेळी मुख्यमंत्री कोरोनाला रोखण्यासाठी कोणती मोठी घोषणा करतात. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी कुठली नवी नियमावली जाहीर करतात याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post