केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला बिबळ्या पँथर दत्तक
मुंबई दि.15 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय रजयमंत्री ना रामदास आठवले यांनी आज पुन्हा बिबळ्या वाघ पँथर नॅशनल पार्क येथे दत्तक घेतला. पर्यावरण रक्षणासाठी निसर्ग संवर्धनासाठी; प्राणिप्रेम जोपासण्याचा संदेश देण्यासाठी आपण बिबळ्या वाघ ( पँथर )दत्तक घेतला आहे. निसर्ग साखळी टिकविण्यात बिबळ्या वाघाचा महत्वाची भूमिका असते.माझे नेतृत्व भारतीय दलित पँथर मधून पुढे आले आहे.अमेरिकेत जशी ब्लॅक पँथर तर तशी भारतात दलित पँथर ही संघटना होती.दलित पँथर पासून आम्हाला पँथर बद्दल विशेष प्रेम  असल्यामुळे पँथर दत्तक घेतला. या पँथर चे नाव सिंबा ठेवण्यात आले आहे.अशी माहिती ना रामदास आठवले यांनी दिली.यावेळी ना. रामदास आठवले  यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले; कुमार जित आठवले;बहिण शकुंतला आठवले आणि रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; दहिसर तालुका अध्यक्ष  दिलीप व्हाव्हले;हरिहर यादव; रमेश गौड; चंद्रशेखर कांबळे; रमेश गायकवाड ; बाळासाहेब गरुड; घनश्याम चिरणकर;अमित तांबे ऍड. अभया सोनवणे;उषाताई रामळू;  श्रीदेवी राठोड; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
             

                  

Post a comment

0 Comments