देशाचं बजेट आहे की OLX ची जाहिरात. .. भाई जगताप



 मुंबई :  अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना 2 सरकारी बँकेचे शेअर्स विकण्याची घोषणा केली. देशात सध्या 12 पब्लिक सेक्टरच्या बँका आहेत. सरकार हळूहळू छोट्या बँकांना मोठ्या बँकेत मर्ज (विलीनिकरण) किंवा सामावून घेणार आहे. याचा फायदा म्हणजे बँकाच्या मालमत्तेत भर पडेल. याशिवाय जे नुकसान झाले आहे त्याची झळ सोसण्यासाठी बळ येईल आणि त्याविरोधात सामना करता येतो. याशिवाय एक इन्शुरन्स कंपनी विकली जाणार आहे. निधी गोळा करण्यासाठी सरकारी कंपन्यांची अतिरिक्त जमीन विकली जाईल.

विशेष म्हणजे वर्ष २०२२ मध्ये दोन सरकारी बँक विकल्या जातील, सरकारी कंपन्यांना अतिरिक्त जमीन विकली जाईल, तसेच २०२२ मध्ये 1 जनरल विमा कंपनी विकली जाईल अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहेएअर इंडियासहित इतर काही सरकारी कंपन्यांच्या बाबतीतही हिस्सेदारी विकण्याचं निश्चित झालं आहे.

याच विषयाला अनुसरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांनी मोदी सरकारला खोचक टोला लगावला आहे. या संदर्भात भाई जगताप यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, "देशाचं बजेट आहे की OLX ची जाहिरात. शक्य असेल तर ते संसदही विकतील.

Post a Comment

Previous Post Next Post