अवकाळी पावसाचा फेरा येण्याची शक्यतामुंबई - राज्यभरात सध्या हवामान कोरडं असलं तरी पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा येण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रालगत चक्रीय वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी विदर्भासह मराठवाड्यात येऊ घातलेला हा अवकाळी पाऊस त्यानंतर बुधवारी पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी हजेरी लावण्याची शक्यता आहे.


येत्या १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान कोकण वगळता मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.दरम्यान राज्यात तापमानातही अपेक्षित वाढ सुरू झाली असून आगमी ३६ तासांत दोन अंशांची तापमान वाढ अपेक्षित आहे.

Post a comment

0 Comments