पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे



मुंबई : 
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील संजय राठोड या मंत्र्याचं नाव या प्रकरणात चर्चेत आल्यानंतर सगळ्याचं लक्ष्य या घटनेच्या घडामोडींकडे लागले आहे. भाजपने या प्रकरणात कडक कारवाईची मागणी केली आहे. अशातच पूजा चव्हाणचा मृत्यू कसा झाला ? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. काही जणांनुसार ती मद्य पिऊन बाल्कनीत बसली होती, त्यात पाय घसरून तिचा मृत्यू झाला. तर अनेकांनी तिने आत्महत्या केल्याचा दावा केला आहे.

याच दरम्यान पूजा चव्हाण हिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. त्यानुसार पूजाच्या डोक्यावर व मनक्याला जखम असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.यावरुन इमारतीवरुन पडल्यानंतर तिच्या डोक्यावर व मनक्याला मार लागला व त्यात तिचा मृत्यू झाला. मात्र, हा अपघात होता की आत्महत्या की आणखी काही, याबाबत अद्याप नेमका खुलासा करण्यात आलेला नाही.


पुणे पोलिसांना महिला आयोगाची नोटीस

विरोधकांकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत असताना आता महिला आयोगाने चौकशी करण्याची मागणी केली आहे. आयोगाकडून राज्य सरकारला नोटीस पाठवण्यात आली असून पुणे पोलीस आयुक्तांनाही नोटीस देण्यात आली आहे. महिला आयोगाने पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी पूजा चव्हाणच्या आत्महत्येची दखल घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली पुणे पोलिसांकडून माहिती

सुत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शुक्रवारी (दि.12) पुणे पोलिसांकडून माहिती घेतली आहे. पोलीस या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का ? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. दुसरीकडे पूजाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्याने आता त्या दिशेने तपास केला जाण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post