मिरज : बनावट तूप व बटर तयार करताना पोलिसांनी छापा टाकून भेसळयुक्त तूप व बटर असा एकूण 1 लाख 8 हजार 880 रुपयांचा माल जप्त करत दोघांना अटक.



मिरज :  शहरातील हरबा तालीमजवळ एका खोलीत बनावट तूप व बटर तयार करताना पोलिसांनी छापा टाकून भेसळयुक्त तूप व बटर असा एकूण 1 लाख 8 हजार 880 रुपयांचा माल जप्त करत दोघांना अटक केली. तसेच, अधिक तपासासाठी पोलिसांनी अन्न सुरक्षा विभागाला बोलावत जप्त केलेला माल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला. एम. नागलिंगा दुर्गाप्पा मुथ्थलकर (वय 35), पी. चंद्रशेखर गुडलाप्पा पल्लेदौर (वय 38, दोघेही राहणार दुर्गाम्मा गुडी बेनकल, ता. हळ्ळी, जि. विजापूर, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.  हरबा तालीम जवळ एका खोलीत बनावट तूप व बटर तयार करत असल्याची माहिती मिरज पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी हरबा तालीम जवळ एका खोलीत छापा टाकत तेथील दोघांकडे चौकशी परंतु, ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. कसून चौकशी केल्यानंतर सदरचा माल कर्नाटकातून आणल्याचे त्यांनी सांगितले. छाप्यात 269 किलो तूप, 4 किलो बटर असे एकूण 1 लाख 8 हजार 880 रुपयांचे बनावट तूप व बटर जप्त केले. तसेच, अधिक तपासणीसाठी अन्न सुरक्षा विभागाकडे माल पाठविला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल होणार आहे..

Post a Comment

Previous Post Next Post