हे वागणं बरं नव्हं.मुंबई - पेट्रोल, डीझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात ठाकरे सरकारकडून मोदी सरकारच्या विरोधात राज्यामध्ये निदर्शने करण्यात आली. इंधन दरवाढीचा निषेध करत राज्यातील अनेक पेट्रोल पंपावरील मशिनला चपलांचा हार घातला गेला. यातच आता या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचावर हल्लाबोल केला.

दरम्यान, राज्य सरकारने इंधनावरची कर कपात करून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत, असा सल्ला फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला होता. त्यावर कारंजा विधानसभा मतदारसंघात आयोजित आढावा बैठकीत जयंत पाटील बोलत होते.यावेळी ते म्हणाले,' आम्हाला सल्ले देण्यापेक्षा फडणवीसांनी 'मोदीजी असं वागणं बरं नव्हं.' असा सल्ला त्यांनी मोदी सरकारला द्यावा, असं म्हणत त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

ते पुढे म्हणाले,'देवेंद्र फडणवीस हे राज्य सरकारला असा सल्ला देत आहेत, मात्र केंद्र सरकारने अजूनही राज्याच्या जीएसटीचा परतावा दिलेला नाही, याची आठवणही जयंत पाटील यांनी यावेळी फडणवीस यांना करून दिली.

Post a comment

0 Comments