कोरोना : आई मरू देत नाही बाप जगू देत नाही अशी अवस्था या राज्यातील जनतेची होउन बसली आहे.

 करोनाची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. “करोनाची दुसरी लाट आणि महागाईने लागली वाट’ अशी अवस्था नागरिकांची झाली आहे त्यामुळे जगायच कसे, असा प्रश्‍न सर्वसामान्यांसमोर उभा ठाकला आहे. पेट्रोल , डिझेल, गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून गेले आहे. कंपनीमध्ये हंगामी कामगारांची संख्या मोठी आहे, त्यामुळे या कामगारांना काम जास्त आणि पगार कमी अशी अवस्था आहे. या कामगारांना साधारणपणे आठ ते पंधरा हजार रुपयांच्या आसपास पगार आहे.

त्यात मुला-मुलींची शिक्षणे, अचानक येणाऱ्या अडचणी, दवाखान्याचा खर्च, तसेच महिन्याचा किराणा अशा गोष्टींसाठी तुटपुंज्या पगारात काटकसर करावी लागत आहे. त्यात कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी किमान दररोज एक लिटर पेट्रोल म्हटले तरी 3 हजार रुपये एक महिन्याचा खर्च करावा लागत आहे. नोकरीसाठी ग्रामीण भागातून शहरांकडे येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. .

त्यातच दर महिन्याचा येणारा खर्च म्हणजे वीजबील सातशे ते आठशे रुपये गॅस सिलिंडर, दुकानातील किराणा, भाजीपाला, चार ते पाच हजार रुपये, जागा, घर, फ्लॅट व गाडी अशासाठी कर्ज घेतले असेल तर त्याचे हप्ते अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता तर खाद्यतेलाच्या भावातही भरमसाठ वाढ झाली आहे. एक लिटर खाद्यतेल पुडा दीडशे रुपयांना मिळत आहे. या वाढत चाललेल्या  महागाईने सर्व सामान्यांचे कंबरडेच मोडले असून घरचे बजेट सुध्दा पार कोलमडले आहे. कुठून आला हा कोरोना सर्वांची वाट लाऊन टाकली.आई मरू देत नाही बाप जगू देत नाही अशी अवस्था या राज्यातील जनतेची  होउन  बसली आहे.Post a comment

0 Comments