- शिरोळ येथील पंचगंगा नदीला रसायन व मळी मिश्रीत पाणी आल्याने हजारो मासे मृत्यूमुखी पडलेकोल्हापूर - शिरोळ येथील पंचगंगा नदीला रसायन व मळी मिश्रीत पाणी आल्याने हजारो मासे मृत्यूमुखी पडले आहेत. यानंतर दुषित, दुर्गंधीयुक्त प्रदुषित पाण्याची तिव्रता कमी करण्यासाठी पाटबंधारे विभागाने रुई व तेरवाड बंधाऱ्यातून स्वच्छ पाणी शिरोळ बंधाऱ्यात सोडण्याची शक्कल लढवली आहे.

बंधाऱ्यात दुषित पाणी आले कुठून याचा शोध घेवून संबंधीतावर कारवाई करण्याच्या ऐवजी स्वच्छ पाणी नदीत पत्रात सोडून पाणी प्रदुषित करणाऱ्या घटकांना वाचवण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभाग करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान पंचगंगा नदी काठावरील सहा साखर कारखान्यांचे मळी मिश्रीत दुषित पाणी नदी पात्रात सोडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.तेरवाड बंधाऱ्यापासून ते शिरोळ बंधाऱ्यादरम्यान पंचगंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त दुषित पाणी सोडण्यात आले आहे. परिणामी पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होण्याबरोबर पाणी विषारी बनल्याने माशांचा मृत्यू होत आहे. बंधाऱ्याच्या पश्‍चिम दिशेच्या पात्रात मृत माशाचा खच निर्माण झाला आहे. पाण्याला दुर्गंधी येत असून रसायन युक्त काळ्या रंगाचे पाणी पिण्यास व वापरण्यास धोकादायक बनले असून नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

Post a comment

0 Comments