पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास यवतमाळ मध्ये

.

यवतमाळ : बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण हिचा पुणे येथे संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पूजावर यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांना एक पत्र दिले.

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरण आता अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. तिचा नेमका मृत्यू कसा झाला, याबद्दल मतप्रवाह आहे. या प्रकरणात एका मंत्र्याचे नाव येत असल्याने हे प्रकरण हायप्रोफाइल झाले आहे. दोन ते पाच फेब्रुवारी दरम्यान पूजा अरुण राठोड या नावाने एका तरुणीवर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आल्याची नोंद आहे.मात्र, ती मुलगी पूजा चव्हाण की, दुसरी हे स्पष्ट झाले नाही.

काल पुणे पोलिसानी यवतमाळ येथे येऊन अधिष्ठाता डॉ. कांबळे यांना एक पत्र दिले. पूजाच्या संदर्भात त्यांच्याकडून विचारणा करण्यात आली. पोलिस आता पुण्याला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात डॉ. कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाइल बंद होता. इतर डॉक्टरांनी काहीही सांगण्स नकार देत या प्रकरण अनभिज्ञता दर्शविली.

पूजा चव्हाणच्या मृत्यनंतर राजकीय वाद निर्माण सुरू झाले आहेत. तिच्या घरच्यांनाही त्याचा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. पण तिच्या मृत्यूनंतर सोशल मिडियात फिरणाऱ्या आॅडिओ क्लिपमुळे संशयाचे वातावरण तयार झाले. भाजपने या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली. त्यात राठोड हे गेले आठवडाभर गायब असल्याने त्यांचीही या प्रकरणातीन बाजू पुढे आलेली

Post a Comment

Previous Post Next Post