महावितरणचा शेतकऱ्यांना "शॉक , महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 22 हजार कोटींना फसवले.कोरोना महामारीचे संकट आणि कर्जबाजारीपणाने गंजलेल्या शेतकऱ्यांना महावितरणनेच फसवले असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना खाडकन जागे करणारी ही बातमी असून वीज नियामक आयोगाच्या अहवालानुसार महावितरणवर अतिरिक्त विज बिल वसुलीचा ठपका ठेवणेत आला आहे.

शेतकऱ्यांसाठी हा शॉक नसून शेतकऱ्यांची केलेली शुध्द फसवणूक आहे असेही म्हटले पाहिजे.IIT पवई आणि MERC ही दोन स्वतंत्र नियामक मंडळे आहेत. त्यांनी सदर अहवाल सादर केले आहेत.राज्यात ४४लाख शेतकरी कृषीपंप वापरतात. त्यांची प्रत्येकी ५०० युनिट विज वापरत नसतानासुध्दा वापरली गेली आहे असे दाखवून रक्कम वसूल केली असून हा आकडा २०१४ ते २०१९ असा पाच वर्षांचा २२हजार कोटी इतका आहे असा MERC चा अहवाल आहे.

अशा प्रकारे न वापरलेल्या विजबिलापोटी शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या महावितरणची थकबाकी शेतकऱ्यांनी भरायची की शेकऱ्यांनाच महावितरणने थकबाकी वसूल रक्कम द्यायची ते आता येणारा काळच ठरवणार आहे.

Post a comment

0 Comments