लॉकडाऊन काळातील वीजबिले तात्काळ रद्द करा अन्यथा आंदोलन- संभाजी ब्रिगेडलॉकडाऊन काळातील वीज बिले ही तात्काळ रद्द करण्यात यावी या विषयीचे निवेदन महावितरण उपकार्यकारी अधिकारी श्री कडाळे साहेब यांना देण्यात आले.कोरोना मुळे झालेल्या लॉकडाऊन मध्ये अनेकांचे रोजगार बुडाले,व्यवसाय स्थगित झाला शेतकऱ्यांना धान्यासाठी पैसे नव्हते सर्व समाजाची आर्थिक स्थिती कोलमडली होती, तरीदेखील लॉकडाऊन काळात भरमसाठ वीज बिले तयार करून ग्राहकांना देण्याचा जो प्रयत्न MSCB कडून होत आहे, तो तात्काळ थांबवून यावर लवकरात लवकर तोडगा काढून तात्काळ वीजबिल माफ करावेत अन्यथा येत्या आठवड्याभरात संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करेल असा इशारा महावितरणला देण्यात आला.यावेळी संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अक्षय पाटील, मा.नगरसेवक चंद्रकांत जाधव(घूनकीकर),

जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.विकास पाटील,

शिरोळ शहराध्यक्ष आकाश खोत,योगेश सारस्वत,राहूल पाटील,अशोक पाटील,सागर चौगुले,दिलीप माने,अमोल बेलवडेकर,संताजी जाधव,तानाजी जाधव,इकबाल सुधरणे,विद्यानंद पाटील,प्रकाश कनवाडे,महेश महाडिक,सूर्यकांत जाधव,चंदू दूरडे,शाम ओझा,अमित पाटील,संभाजी जाधव,अनंत विभूते,संजय चव्हाण,अमोल शिंदे,पराग करमकर,शीतल काडगे,हैदर मुश्रीफ उपस्थित होते

Post a comment

0 Comments