देशभक्ती पर गीतांचा कार्यक्रम संपन्न*
महाराष्ट्र हौसिंग सोसायटी भाग्यश्री कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने व संगीत रजनी ग्रुपच्या वतीने मंगळवार दि.२६ जानेवारी, २०२१ रोजी संध्याकाळी "प्रजासत्ताक दिनानिमित्त" देशभक्तीपर गीतांचा सदाबहार कार्यक्रम अति उत्साहात संपन्न झाला.

प्रथम संगीत रजनी ग्रुपच्या बोर्डाचे अनावरण मा.श्री नागेश बसूदे यांनी हार अर्पण करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.शिवकुमार मुरतले सर यांनी संगीत रजनी ग्रुपची सुरुवात कशी व कधीपासून झाली याचा थोडक्यात आढावा घेतला. कोरोनाच्या महामारीमुळे जगभरात व देशभरात लोकांची झालेली दयनिय परिस्थितीत लोकांना घराबाहेर पडता येत नव्हते. अशा वेळी घरी बसून करायचे तरी काय अशी मानसिक स्थिती असताना मोठमोठ्या शहरांमध्ये बरेच लोक डिप्रेशनमध्ये गेले. अशा मानसिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कला व संगीत हे फार मोठे वरदान ठरले यातूनच शिवाजी पाटील यांना एक कल्पना सुचली. मुळात त्यांच्यातील गायक कलाकार जागा होवून त्यांनी भागातील गायक कलाकार व रसिकांना एकत्रित केले व कराओके ट्रॅक वरती घरच्या घरी किंवा टेरेस वरती संगीत मैफीलीच्या माध्यमातून एक छोटासा उपक्रम राबवला. आठवड्यातून एक दिवस दोन तास गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात केली. यातून भागातील बरेच स्त्री-पुरुष कलाकार तयार झाले. या सर्वांना गाण्याची आवड होवून स्टेज डेरिंग निर्माण झाले. अशारीतीने या संगीत रजनी ग्रुपचा उगम झाला. यामध्ये सौ.सुषमा मिणेकर, नितीन मिणेकर, अलका खराडे तसेच सुरपूरे, जाधव, कुंभार व बसुदे कुटुंबीय, मुरतले कुटुंबीय, लालजी मेस्त्री इत्यादींचा सहभाग वाढू लागला. बरेच कार्यक्रम झाले. यात लोकांचा सहभाग वाढला तसेच या कार्यक्रमाची मागणी वाढू लागली. लांजा येथे ज्येष्ठ व्यक्तिंच्या वाढदिवसाचा उत्कृष्ट कार्यक्रम झाला. त्याचबरोबर राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भावगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. अशा रीतीने घरातून टेरेस वर टेरेस वरून खुल्या वातावरणात या संगीत रजनी ग्रुपची वाटचाल सुरू झाली.   सर्वांचे सहकार्याने पुढील कार्यक्रम नाट्यगृहात करण्याचे योजिले आहे असे प्रास्तविकाच्या मनोगतात श्री शिवकुमार मुरतले सर यांनी व्यक्त केले.या भागातील सामाजिक कार्यकर्ते व तडफदार व्यक्तिमत्व श्री.गणेश जाधव यांनी देशात विविध प्रकारच्या समस्या असताना देशभक्ती ही कोणत्याही माध्यमातून करता येते देशाच्या सीमेवर जाऊन लढले म्हणजे देशप्रेम नव्हे तर आपले नेहमीचे कोणतेही काम प्रामाणिकपणे करणे ही सुद्धा  देशाची सेवाच आहे. त्यासाठी सीमेवर जाऊन लढण्याची गरज नाही. तेसुद्धा खरे देश प्रेम आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. देशभक्तीपर गीत गाऊन देशासाठी बलिदान केलेल्या शूरवीरांना आदरांजली वाहणे हे आपले कर्तव्यच आहे हे सांगून आपल्या कार्याचा आढावा संपुर्ण पणे नमूद केला. यानंतर सुषमा मिणेकर शिवाजी पाटील, साक्षी जाधव, संतोष कोष्टी, सिद्धार्थ सुतार, श्रीकांत देसाई सर, अजिंक्या वाळवेकर, रविंद्र कमते,राजू केसरकर, सिमरन मिणेकर, उमेश मिणेकर, शितल मिणेकर व कमल गागडे इ. कलाकारांनी देशभक्तीपर गीत सादर केले. या कार्यक्रमाची यु ट्यबवरील न्यूज चॅनेल देखील दखल घेत काही गाण्याचे रेकॉडिंग केले. या सर्व कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री.विजयानंद लंबे सर यांनी केले. उपस्थित कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्प देवून सन्मान केला. कार्यक्रम पाहण्यासाठी विविध स्तरावरील मान्यवर व्यक्ती श्री.राहूल निकम, राजू बचाटे, अनिल आलासकर, सुरसिंग मिणेकर, अशोक ठोमके तसेच भागातील देशाभिमान असणारे सर्व बालकांपासून ते ज्येष्ठ व्यक्तिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शेवटी श्री.विजयानंद लंबे सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाल्याचे जाहीर केले.

Post a comment

0 Comments