*वन्यप्राणी प्रकरणी राज्यमंत्री यड्रावकर यांनी दिली दत्तवाड गावाला भेट.
दतवाड-

शिरोळ तालुक्यातील दत्तवाड गाव आणि परिसरामध्ये बिबट्या सदृश्य वन्यप्राणी आढळल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले होते,

वनविभागाने रविवारी या भागात ट्रॅप कॅमेरे बसवून वन्यप्राण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, वनविभागाचे 15 अधिकारी व कर्मचारी दतवाड परिसरात रविवार पासून शोध घेत आहेत सोमवारी नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दतवाड गावाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली व नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याबाबत सांगितले.


या ठिकाणी उपस्थित असलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना राज्यमंत्री यड्रावकर यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या, यावेळी डी.एन.सिदनाळे, बबन चौगुले, नूर काले, आदिनाथ हेमगिरे, दौलत माने, खराडे वकील, सुकुमार सिदनाळे, चंद्रकांत कांबळे, ए.सी. पाटील, प्रभू चौगुले, नाना नेजे, अशोक पाटील दत्तवाड ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a comment

0 Comments