कोल्हापूर : श्रीमंत शाहू महाराज यांनी घेतलं राजर्षी छत्रपती शाहू समाधीस्थळाच दर्शन


कोल्हापूर – कोल्हापूर महापालिकेच्या नर्सरी बागेत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी आज करवीर संस्थानचे राजे शाहू महाराज छत्रपती यांनी भेट दिली आहे. 

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संजयसिंह चव्हाण, यशराजराजे, यश्वस्विनीराजे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी शाहू महाराजांनी समाधीस्थळी अभिवादन करत पुष्पहार अर्पण केला. तसेच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह असणाऱ्या प्रमुख उपस्थित असणाऱ्या सर्वांनी समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारीच्या उपाययोजना घेण्यात आल्या होत्या.

Post a comment

0 Comments