कन्हैया कुमारच्या खुल्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारलीकोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरात उद्या स्मृती जागर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य कन्हैयाकुमार यांची खुल्या मैदानात जाहीर सभा घेण्यात येणार होती.परंतु आता या सभेला परवानगी नाकारली असल्याचे सांगण्यात आले आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या कारणास्तव कोल्हापूर पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली आहे. तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत ही सभा होणार असल्याची माहिती ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन चे नेते कॉम्रेड गिरीश फोंडे यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना गिरीश फोंडे म्हणाले कन्हैया कुमार यांच्या सभेला काही तास शिल्लक असताना खुला मैदानावरील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी कोणत्याही परिस्थितीत ऐतिहासिक दसरा चौकामध्ये ही सभा होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यासाठी तयारीही सुरू करण्यात आली आहे.

Post a comment

0 Comments